भोजपुरी अभिनेते आणि भाजप नेते मनोज तिवारी तिसऱ्यांदा बाबा झाले आहेत. त्यांनी खुद्द ट्विट करून घरामध्ये कन्येच्या आगमनाची खुशखबर दिलीय. भोजपुरी अभिनेता, गायक आणि राजकारणी मनोज तिवारी यांच्या घरी पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या घरी कन्यारत्न जन्माला आलीय. खुद्द मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांनी ट्विट करून ही आनंदाची बातमी दिली आहे. रुग्णालयातून पत्नी सुरभीसोबतचा फोटो शेअर करत त्यांनी मुलीच्या जन्माची आनंदाची बातमी दिली. यानंतर सोशल मीडियावर लोक त्यांचे अभिनंदन करत आहेत.
मनोज तिवारी यांनी ट्विट करून लिहिले- "माझ्या घरी लक्ष्मीनंतर सरस्वतीचे आगमन झाले आहे, हे कळवताना अतिशय आनंद होत आहे…आज घरात एका सुंदर मुलीचा जन्म झाला आहे…तुम्ही सर्वांनी तिला आशीर्वाद द्यावा. सुरभी-मनोज तिवारी " (Manoj Tiwari)
मनोज तिवारी यांनी काही दिवसांपूर्वी पत्नीच्या बेबी शॉवरचा व्हिडिओ शेअर केला होता. वयाच्या ५१ व्या वर्षी ते बाबा झाले आहेत. मनोज तिवारी यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून रिती नावाची मुलगी आहे. सुरभी ही मनोज तिवारी यांची दुसरी पत्नी आहे. २०२० मध्ये पहिली मुलगी सान्विकाचा जन्म झाला. आता तिसऱ्यांदा त्यांच्या घरी कन्येचे आगमन झाले आहे.
हेही वाचा :