‘रफु चक्कर’ मधील मनीष पॉलचा हटके लूक व्हायरल

‘रफु चक्कर’ मधील मनीष पॉलचा हटके लूक व्हायरल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता मनीष पॉल यांचा आगामी वेबसिरीज 'रफु चक्कर' चर्चेत आला आहे. या वेबसिरीजचा धमोकदार टीझर आणि पोस्टर रिलीज करण्यात आला आहे.

'रफु चक्कर' च्या ट्रेलरमध्ये अभिनेता मनीष पॉल वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. आपल्या पहिल्याच वेबसिरीजव्दारे ओटीटी स्पेसमध्ये पदार्पण करत अभिनेता मनीष पॉल एका ठगच्या मनोरंजक पात्रात दिसणार आहे. ही वेबसिरीज १५ जून रोजी छोट्या पडद्यावर रिलीज होणार आहे. यामध्ये मनीष पॉल कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहेत.

अप्रतिम स्क्रीन प्रेझेन्ससाठी आणि परफेक्ट कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जाणारा मनीष त्याच्या अभिनयाच्या पराक्रमाच्या सीमा ओलांडणाऱ्या भूमिकेत अॅक्शन करताना दिसून येणार आहे. अप्रतिम अष्टपैलुत्व व्यक्तिमत्त्व असलेला हा अॅक्टर एका फिटनेस तज्ञापासून ते जाड वृद्धापर्यंत, पंजाबी वेडिंग प्लॅनरपासून ते हँडसम हंक अशा मजेदार लुकने चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यास सज्ज झाला आहे.

रफु चक्करचे जग हे जलद, नाट्यमय आणि चपखल असुन प्रेक्षकांची आवड जपून आहे. फेस-मॅपिंग, डीप फेक, डिजिटल फूटप्रिंट मॅपिंगपासून ते जुन्या तपास शैलीपर्यंतच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या गुन्ह्यांमधून ही कथा या वेबसीरिजला मनोरंजक बनविते.

ज्योती देशपांडे, अर्जुन सिंग बरन, कार्तिक डी. निशानदार निर्मित आणि रितम श्रीवास्तव दिग्दर्शित हा कॉन थ्रिलर ड्रामा १५ जून २०२३ ला चाहत्याच्या भेटीस येत आहे. या वेबसीरिजमध्ये प्रिया बापट, अक्षा परदासनी, सुशांत सिंग आणि शिरीन सेवानी यांच्या महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news