Dev Anand : देव आनंद यांच्या ७३ वर्षांपूर्वीच्या जुहूमधील बंगल्याची विक्री, इतक्या कोटींमध्ये झाली डील

dev anand
dev anand

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्गज दिवंगत अभिनेते देव आनंद बॉलीवूडचे सुपरस्टार होते. देव आनंद यांनी तमाम हिट चित्रपट दिले होते. (Dev Anand) आता देव आनंद यांचे मुंबईतील पॉश परिसरातील जुहूमधील बंगल्याविषयी मोठी माहिती समोर आलीय. देव आनंद यांच्या निधनानंतर हे घर रिकामं पडलं होतं. त्यांची पत्नी आणि मुले शहराबाहेर निघून गेले. विविध शहरांमध्ये त्यांची फॅमिली गेल्यामुळे देव आनंद यांच्या फॅमिलीने जुहूतील बंगला विकला आहे. (Dev Anand)

देव आनंद यांनी १९५० मध्ये जुहूमध्ये घर बनवलं होतं. त्यावेळी हिरवाईने नटलेल्या एकांतात हे घर होतं. २०११ मध्ये अभिनेता देव आनंद यांचे निधन झाले. तेव्हापासून हा बंगला रिकामा पडला होता. एका रिपोर्टनुसार, देव आनंद यांचा मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला. त्यांची पत्नी कल्पना आपली मुलगी देविनासोबत ऊटीमध्ये राहतात. रिपोर्टनुसार, देव आनंद यांचा बंगला एका रिअल इस्टेट कंपनीने ४०० कोटी रुपयांमध्ये विकला. देव आनंद यांचा बंगला आज ज्याठिकाणी आहे, तेथे प्रामुख्याने अनेक प्रसिद्ध सेलेब्स आणि इंडस्ट्रिॲलिस्टची बंगले आहेत.

रिपोर्टनुसार, देव आनंद यांच्या फॅमिलीने महाराष्ट्रातील पनवेलमध्ये काही संपत्ती विकली आहे.

देव आनंद यांचा बंगला तोडून मल्टी स्टोरी बिल्डिंग उभारणार

रिपोर्टनुसार, देव आनंद यांच्या बंगल्याच्या जागी २२ मजली नवी इमारत उभारणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news