पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेते आशिष विद्यार्थी ( Ashish Vidyarthi ) यांनी वयाच्या ६० व्या वर्षी ३३ वर्षीय लहान असलेल्या मुलीसोबत लग्न केल्याने चर्चांना उधाण आले आहे. आशिष यांनी काल म्हणजे, २५ मे २०२३ रोजी मोजक्यात नातेवाईकांच्यात आसामची रहिवाशी असलेली रुपाली बरुआ हिच्याशी लग्न केले. लग्नानंतर ६० व्या वर्षी लग्न करायला पहिल्या पत्नीने कशी सहमती दिली? याविषयावर अनेक तर्क- वितर्क लाढविले जात होते. दरम्यान आशिष यांची पहिली पत्नी राजोशी विद्यार्थीने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राजोशी विद्यार्थीने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, 'आम्ही दोघेजण दोन वर्षापासून वेगळे राहत आहोत. त्यांनी मला फसवलं गेलं नाही. गेल्या वर्षभरापूर्वीच आम्ही विभक्त झालो आहोत. ही गोष्ट आशिष यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली नाही. कारण त्यांना ही घटना खाजगीत ठेवायची होती. आम्हाला एक मुलगा असून तो विदेशातील एका कंपनी नोकरीला आहे. कोणतेही भांडण झाले नसून सामंजस्याने आणि एकमेंकाच्या काही गोष्टी पटत नसल्याने विभक्त झालो. त्यांनी केलेल्या लग्नाबद्दल मला अजिबात तक्रार नाही.'
'अनेकदा लोकांना वाटतं की, लग्नानंतर आयुष्यात खूपच तडजोड करावी लागते. काहीजण ती करतात आणि काही जणाना ते जमत नाही. बंद घरात काय चाललंय हे कधीच कोणाला समजत नाही. अनेकदा मी पाहले आहे की, लोक सोशल मीडियावर त्यांच्या पार्टनरसाठी लांबलंचक पोस्ट शेअर करतात. मात्र, त्या पोस्ट मागचे सत्य काय आहे? हे कोणालाच माहित नसते. आम्हच्यात कोणतेही भांडण झाले नसल्याने त्यांनी घटस्फोटोच्या दरम्यान मला चांगला पाठिंबा दिला. आम्ही गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. तो मान्य झाला आहे. सध्या आम्ही ( Ashish Vidyarthi ) चांगले मित्र आहोत.' असेही तिने म्हटले आहे.
हेही वाचा :