Kaun Banega Crorepati १५ व्या सीझनची घोषणा?, बिग बींची नव्या अवतारात घर वापसी

 Kaun Banega Crorepati
Kaun Banega Crorepati

पुढारी ऑनलाईन डेस्क : दोनशेंहून अधिक धमाकेदार चित्रपटात आपला अभिनय साकारणारे अभिनेता अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती' ( Kaun Banega Crorepati ) या शोमधून चर्चेत आले आहेत. बिग बींनी या शोचे एक- दोन नाही तर जवळपास सगळ्या सीझनचे प्रभावीपणे सुत्रसंचालन केलं आहे. या शोनं रसिकांच्या मनोरंजनासोबत ज्ञानात भर घातली आहे. कौन बनेगा करोडपतीचे १४ वा धमाकेदार सीझन पार पडल्यानंतर चाहते त्याच्या नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान बिंग बींनी १५ व्या सीझनची घोषणा करत चाहत्याची उत्कंठा वाढविली आहे.

बिग बींच्या कौन बनेगा करोडपतीच्या ( Kaun Banega Crorepati ) नवीन सीझनसाठी चाहते खूपच उत्सुक होते. याच दरम्यान निर्मात्यांनी त्यांच्या उत्साहात भर घालत इंस्टाग्रामवर शोचा नवीन प्रोमो जारी केला आहे. या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन देशातील नव्या बदलाबद्दल मनमुराद बोलताना दिसत आहेत. दरम्यान 'KBC १५' देखील नव्या रुपात परत येत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहेत.

निर्मात्यांनी शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सुरूवातीला अमिताभ यांनी देशाने बदल स्वीकारला आहे असे सांगत, एक बदल जो, देशाच्या वाढीला चालना देतो, एक बदल जो, आपल्या मानसिकतेला पुन्हा चालना देतो आणि एक बदल जो, नवीन आकांक्षांना प्रेरणा देतो. मोठ्या अभिमानाने, मोठ्या ज्ञानाने… पहा देशात सर्वत्र काही बदलत आहे. आणि हा बदल देशातील सर्वात मोठा गेम शो 'कौन बनेगा करोडपती' शोतून दिसून येणार आहे. कौन बनेगा करोडपतीचा १५ वा सीझन एका नवीन अवतारात पाहायला मिळणार असे वचन देतो. असे त्यांनी म्हटलं आहे.

निर्मात्यांनी या शोचा प्रामो रिलीज केला आहे. मात्र, शोच्या प्रीमियरची तारीख आणि त्याची नोंदणी सुरू होण्याची तारीख याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी आनंद द्विगुणीत झाला आहे.

'कौन बनेगा करोडपती' चा पहिला सीझन २००० साली रिलीज झाला होता. तेव्हापासून चाहत्यांच्या आवडत्या शोच्या यादीत पहिल्या क्रमांकावर हा शो राहिला आहे. फक्त या शोच्या तिसऱ्या सीझनचे सुत्रसंचालन शाहरुख खानने केलं होते. हे सोडले तर सर्वच सीझनचे धमाकेदार सुत्रसंचालन अमिताभ बच्चन यांनी केले आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news