Akshay Kumar : अक्षयने शर्टलेस होवून दाखविला ‘तो’ टॅटू

Akshay Kumar
Akshay Kumar

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार ( Akshay Kumar ) त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये उत्तराखंडामध्ये बिझी आहे. यावेळी अक्षयने उत्तराखंडामधील बद्रिनाथ धाम आणि जोगेश्वर मंदिराला भेट देवून तेथील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता अक्षयने त्याच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलं असून त्याची माहिती एक शर्टलेस फोटो शेअर करून सोशल मीडियावर दिली आहे.

अभिनेता अक्षय कुमारने ( Akshay Kumar ) त्याच्या इन्स्टाग्रामवर एक शर्टलेस फोटो शेअर करत चित्रपटाचे शुंटिग संपले असल्याची माहिती दिली आहे. मात्र, या फोटोत अक्षय पाठमोरा उभारला असल्याने त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही. तर फोटोतील अक्षयच्या पाठीवरील टॅटूने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे. अक्षयच्या पाठीवर मुलाच्या नावाचा म्हणजे 'आरव' अशा टॅटू नोंदवला गेला आहे.

या फोटोच्या कॅप्शमध्ये अक्षयने 'अप्रतिम देवभूमीमध्ये चित्रपटाचे शूटिंग शेड्यूल पूर्ण केले आहे. लव्ह यू उत्तराखंड ♥️. लवकरच परत येण्याची आशा आहे.' असे लिहिले आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्याची भऱभरून कौतुकाचा वर्षाव करत कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय. शर्टलेस फोटोवर १२ लाखाहून अधिक जणांनी लाईक्स आणि कॉमेन्टस केल्या आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास अक्षय कुमार आगामी 'पाईपलाईन', 'बडे मिया छोटे मिया' आणि 'हेरा फेरी ३' या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news