मंचर : देशी दारूची वाहतूक करणार्‍यांवर कारवाई

मंचर : देशी दारूची वाहतूक करणार्‍यांवर कारवाई
Published on
Updated on

मंचर, पुढारी वृत्तसेवा: अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील पहाडदरा फाटा येथे देशी दारूची वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर मंचर पोलिसांनी कारवाई केली. या वेळी पोलिसांनी त्यांच्याजवळील 13 हजार 440 रुपयांची देशी दारू व 80 हजार रुपयांची टाटा नॅनो गाडी असा 93 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी विजय विष्णू हिंगे (वय 34) व विष्णू गोविंद हिंगे दोघे (रा. अवसरी बुद्रुक, ता. आंबेगाव) यांच्यावर दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचरचे पोलीस जवान मंगेश लोखंडे यांना गुप्त बातमीदारामार्फत अवसरी बुद्रुक गावच्या हद्दीत पहाडदरा फाटा येथे एक व्यक्ती त्याच्या नॅनो कारमध्ये देशी दारूचा माल घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस जवान लोखंडे, पोलीस कर्मचारी व दोन पंच यांनी रस्त्यावर थांबून संशयावरून गाडीला अडविले. या गाडीत विजय विष्णू हिंगे व त्याच्याकडे 13 हजार 440 रुपये किमतीचे देशी दारूचे चार बॉक्स मिळून आले. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने हा माल वडील विष्णू गोविंद हिंगे यांनी मला विक्री करण्याकरिता घेऊन येण्यास सांगितले. पोलिसांनी दारू व गाडी मिळून 93 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्या दोघांवर दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जवान नीलेश खैरे हे तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news