Acid In Water Bottle : वाढदिवसाच्या पार्टीत पाण्याच्या बॉटलमध्ये अ‍ॅसिड; दोन अल्पवयीन मुलांची प्रकृती गंभीर

Acid In Water Bottle : वाढदिवसाच्या पार्टीत पाण्याच्या बॉटलमध्ये अ‍ॅसिड; दोन अल्पवयीन मुलांची प्रकृती गंभीर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : वाढदिवसाच्या पार्टीत दोन अल्पवयीन मुलांना पाण्याच्या बाटल्यांमध्ये अॅसिड दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पाकिस्तानमधील लाहोरच्या एका रेस्टॉरंटमध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित रेस्टॉरंटच्या मॅनेजरला अटक केली आहे. Acid In Water Bottle

27 सप्टेंबर रोजी ऐतिहासिक ग्रेटर इक्बाल पार्कच्या 'कवी रेस्टॉरंट'मध्ये घडलेल्या या घटनेने पार्टीतील लोकामध्ये एकच खळबळ उडाली. अल्पवयीन मुलांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एफआयआरनुसार, मुहम्मद आदिल यांनी कवी रेस्टॉरंटमध्ये कौटुंबिक वाढदिवसाची पार्टी दिली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनूसार, "कर्मचारी पाण्याच्या बाटल्या दिल्या असता माझा पुतण्या अहमदने हात धुतले. त्यानंतर लगेचच तो रडायला लागला आणि पाण्याच्या बाटलीत अॅसिड असल्याने त्याच्या हाताला जखमा झाल्याचं आम्ही पाहिलं," तक्रारदार आदिल म्हणाले. तसेच त्यांची अडीच वर्षांची भाची वजिहा हिला दुसऱ्या पाण्याच्या बाटलीत अॅसिड प्यायल्याने तिला उलट्या होऊ लागल्या.

दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, वजिहाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी रेस्टॉरंट मॅनेजर आणि इतर पाच कर्मचार्‍यांविरुद्ध पाकिस्तान दंड संहितेच्या कलम ३३६बी (संक्षारक पदार्थाने दुखापत झाल्याची शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधिकारी ताहिर वकास यांनी सोमवारी याबाबत दिलेल्या माहितीनूसार, "आम्ही रेस्टॉरंट मॅनेजर मुहम्मद जावेदला अटक केली आहे आणि या प्रकरणाशी संबंधित अन्य लोकांचा तपास घेतला जात आहे." तपास पूर्ण होईपर्यंत पोलिसांनी रेस्टॉरंटही बंद केल्याचे त्यांनी सांगितले. "ही एक विचित्र घटना आहे आणि आम्ही सर्व बाजूंनी याचा तपास करत आहोत," असे अधिकारी यावेळी म्हणाले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news