कोल्हापूर : पैशांचा वाद पोहोचला टोकाला, महिलेवर चांदी पॉलिशचे फेकले ॲसिड

कोल्हापूर : पैशांचा वाद पोहोचला टोकाला, महिलेवर चांदी पॉलिशचे फेकले ॲसिड

कुरूंदवाड : पुढारी वृत्तसेवा

अब्दुललाट (ता. शिरोळ) येथे पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून एका महिलेवर अ‍ॅसिड फेकून जखमी केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी सव्वासात वाजता घडला. याप्रकरणी दादासो रामचंद्र जोशी ऊर्फ भोसले (वय 54, रा. अब्दुललाट) याच्याविरुद्ध पीडित महिलेने कुरूंदवाड पोलिसांत फिर्याद दिली आहे.

महिला गंभीर जखमी असल्याने तिला प्रथमोपचारानंतर सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले.

संबंधित महिला व संशयित दादासो जोशी यांच्यात भागीदारीमध्ये सोन्या-चांदीचा व्यवसाय आहे. या दोघांत अब्दुललाट येथील भगतसिंग चौकात पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद झाला. रागाच्या भरात जोशी याने सोने-चांदी पॉलिश करण्यासाठी आणलेले अ‍ॅसिड पीडित महिलेच्या तोंडावर फेकल्याने ती जखमी झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news