Maharashtra Cabinet expansion | राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे खातेवाटप मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरच

Maharashtra Cabinet expansion | राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे खातेवाटप मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरच

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांचा शपथविधी होऊन आठवडा उलटला तरी त्यांना खाती मिळाली नाही. भाजप आणि शिंदे गट यांच्या आमदारांना मंत्रिपद न मिळाल्याने खातेवाटप रखडले आहे. आता दोन दिवसांत राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच खातेवाटप होणार आहे. (Maharashtra Cabinet expansion)

राज्यातील मंत्रिमंडळात सध्या 14 जागा रिक्त आहेत. यात भाजपला 7, शिंदे गटाला 4 आणि उर्वरित 3 मंत्रिपदे राष्ट्रवादीच्या आमदारांना मिळू शकतात. याच दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाचाही विस्तार होत असून या विस्तारात शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या खासदारांना केंद्रात मंत्रिपद मिळू शकते. हे दोन्ही विस्तार एकाच वेळी करण्याचा भाजपचा प्लॅन आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधून फूट पडून नऊ आमदार मंत्री झाले आहेत. अर्थखाते अजित पवार यांच्याकडे देण्याला शिंदे गटाचा विरोध असून त्यामुळे खातेवाटप थांबले आहे. राज्य वितधमंडळाचे 17 जुलै रोजी अधिवेशन सुरू होत आहे. यापूर्वी मंत्रिमंडाळाचा विस्तार आणि खातेवाटप होणार आहे. शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांना संधी देऊन नाराजी दूर झाल्यानंतर खातेवाटप केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादीला अर्थ, ऊर्जा, गृहनिर्माण

राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ, जलसंपदा, गृहनिर्माण, महिला व बालकल्याण, अन्न व नागरी पुरवठा, ऊ र्जा ही खाती दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र हे सर्व नव्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरच होणार आहे. (Maharashtra Cabinet expansion)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news