पाणीपुरी खायचीय? आधार कार्ड दाखवा, मगच चव चाखा

पाणीपुरी खायचीय? आधार कार्ड दाखवा, मगच चव चाखा
Published on
Updated on

नवी दिल्ली : जगभरात खाण्यापिण्याच्या शौकिनांची काहीही कमी नाही. हेच कारण आहे, ज्यामुळे स्वादिष्ट खाण्याचे पदार्थ येतच राहतात. आजकाल जागोजागी झालेल्या फूड स्टॉल्सनीदेखील या वैभवात भरच घातली आहे. खाण्याच्या पदार्थात वैविध्यता याचमुळे वाढली आहे. आता लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत खाण्यापिण्याच्या सवयी वेगवेगळ्या असू शकतात.

पण, यात सर्वांची समसमान एक आवड असू शकते, ती म्हणजे पाणीपुरी. पाणीपुरी असे फास्टफूड आहे, ज्यासाठी काही ठिकाणी क्यूमध्येदेखील थांबावे लागते. मात्र, अलीकडेच एक अनोखा व्हिडीओ व्हायरल झाला असून यानुसार, तेथे पाणीपुरी खायची असेल, तर चक्क आधार कार्डची सक्ती आहे. आधार कार्ड दाखवले, तरच या ठिकाणी पाणीपुरी खाता येते.

इन्स्टाग्रामवर याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील फूड ब्लॉगर सांगतो की, येथे 20 रुपयांत सहा पाणीपुरी मिळतात. पण, हैराण करणारी बाब म्हणजे येथे फक्त पुरुषांनाच पाणीपुरी खिलवली जाते. शिवाय, त्यांनाही आधार कार्डची सक्ती आहे. आधार कार्ड दाखवले, तरच आपण इथे पाणीपुरीची चव चाखू शकता.

या ठेल्यावर असेही लिहिले आहे की, 18 वर्षांखालील मुलांना पाणीपुरी मिळत नाही. सदर ठेला चालवणार्‍या फेरीवाल्याचे मत असे आहे की, पाणीपुरीमुळे शुगर वाढते व अ‍ॅटॅकचा धोकाही वाढतो. आता वस्तुस्थिती काहीही असो; पण या व्हिडीओवर नेटिझन्स भरभरून व्यक्त होत आहेत. याबाबत विविध मतमतांतरेही राहिली आहेत. यादरम्यान एका यूजरने लिहिले, 'जिसको मरना है खाओ!' आणखी एक यूजर म्हणाला, 'पेट नही, आदमी साफ हो जाएगा!'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news