मळद: सोलापूर महामार्गावर असणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलावर डंपरला मोठा अपघात

मळद: सोलापूर महामार्गावर असणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलावर डंपरला मोठा अपघात
Published on
Updated on

रावणगाव, पुढारी वृत्तसेवा: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद ( ता.दौंड ) हद्दीतील रेल्वे उड्डाण पुलावर भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरचा अचानक स्टेअरिंग रॉड तुटल्याने डंपर दुभाजकावरून दुसर्‍या मार्गिकेत जाऊन सुरक्षा कठड्यावर अडकला. सुदैवाने दुसऱ्या मार्गिकेत वाहन नसल्याने मोठी दुर्घना टळली. ही घटना मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.

मळद हद्दीतील रेल्वे उड्डाणपुलावर सोलापूरकडून पुण्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरचा ( एमएच. १२, एफ.झेड. ८९२२ ) हा अपघात झाला. उड्डाण पुलाच्या सुरक्षा कठडयावर मध्यभागी डंपर अडकला. अन्यथा डंपर पुलावरून तीस-पस्तीस फुट खाली कोसळला असता. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले असले तरी चालकाचे प्राण वाचल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत पोलिसात उशिरापर्यंत फिर्याद दाखल झालेली नव्हती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news