महाराष्ट्राच्या एसटीला मध्य प्रदेशात अपघात; गिरीश महाजन इंदूरकडे रवाना

महाराष्ट्राच्या एसटीला मध्य प्रदेशात अपघात; गिरीश महाजन इंदूरकडे रवाना

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. अपघात आणि बचावकार्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याकडून माहिती घेतली आहे. आमदार गिरीश महाजन हेही घटनास्थळी जाणार आहेत. आपण ३ वाजता विमानाने इंदूरकडे रवाना होणार असून ५ पर्यंत घटनास्थळी पोहचणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

इंदोर येथून अमळनेरला जाणाऱ्या बसच्या चालकाचे खलघाट संजय सेतू पुलावर वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे बस थेट नदीत जाऊन कोसळली. घटनास्थळी पोलीस, एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु आहे. या अपघातात १३ जण ठार झाले आहेत. तर १५ जणांना वाचवण्यात आले आहे. झालेली घटना दुर्दैवी असून प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे.  सायंकाळी ५ पर्यंत घटनास्थळी पोहचणार आहे, असे आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news