इस्लाम कबूल कर, नाहीतर गोळ्या घालीन! अल्पवयीन मुलीला धमकी

इस्लाम कबूल कर, नाहीतर गोळ्या घालीन! अल्पवयीन मुलीला धमकी
Published on
Updated on

मीरारोड : पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला बुरखा घालून इस्लाम धर्म कबूल करण्यासाठी धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इस्लाम कबूल न केल्यास गोळ्या घालीन, अशी धमकीही या मुलीला देण्यात आली. भाईंदर पश्चिमेला राहणार्‍या मुलीबाबत हा प्रकार घडला. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून भाईंदर पोलिस ठाण्यात दोन तरुणांवर विविध कलमांसह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मुनव्वर मन्सुरी (वय 20) आणि अजीम मन्सुरी (18) अशी या तरुणांची नावे आहेत. भाईंदर येथे राहणारी ही पीडित मुलगी 13 वर्षाची आहे. एक जूनपासून मुनव्वर आणि अजीम हे दोन तरुण तिच्याकडे पाहून अश्लील चाळे करून बोलण्याच्या प्रयत्न करत होते.

मुनव्वरने 12 जूनला रात्री मुलीला इमारतीच्या टेरेसवर नेले. तिला बुरखा, चेन आणि अंगठी दिली. तू बुरखा घालून ये, आपण पळून जाऊन लग्न करू, असे त्याने सांगितले. त्यावेळी पीडित मुलीने त्याला नकार दिला. मुनव्वर याने मुलीला नकली बंदुकीचा धाक दाखवून तू बुरखा घालून इस्लाम धर्म कबूल केला नाहीस तर तुला गोळ्या घालीन, अशी धमकी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news