अकोला : आमदार नितीन देशमुखांच्या मालमत्तेची चौकशी होणार; एसीबीने बजावली नोटीस

नितीन देशमुख
नितीन देशमुख

अकोला: पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे, बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात येणार आहे. या संदर्भात शासनाने निर्देशीत केलेल्या अहवालानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना नोटीस बजावली आहे. यासाठी अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात आ. नितीन देशमुख यांना १७ जानेवारीला चौकशीसाठी बोलावले आहे.

यासंदर्भात ६ जानेवारी रोजी एसीबीने बजावलेल्या नोटीसनुसार, आपल्या संपत्तीची उघड चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती येथे सुरु आहे. सदर उघड चौकशीसंदर्भात आपले बयाण नोंदवणे आ‌वश्यक असल्याने १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती येथे उपस्थित राहावे असे आदेश अप्पर पोलिस अधिक्षक अरुण सावंत यांनी दिले आहेत.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news