पुणे: केवळ ४७ मतं मिळाल्यानंतर अभिजीत बिचुकलेंची पहिली प्रतिक्रिया

पुणे: केवळ ४७ मतं मिळाल्यानंतर अभिजीत बिचुकलेंची पहिली प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन: कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा ११०४० एवढ्या विजय झाला आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या विरुद्ध झालेल्या चुरशीच्या लढतीत धंगेकरांनी बाजी मारली. तर दुसरीकडे, या निवडणुकीत बिग बॉस फेम अभिनेते अभिजीत बिचुकले यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता.

या निवडणुकीत अभिजित बिचुकले यांना केवळ ४७ मतं मिळाली आहेत. कसब्यातील मतदारांनी बिचुकले यांच्यापेक्षा जास्त 'नोटा'ला मतदान केलं आहे. या निवडणुकीचा निकालानंतर बिचुकले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "मी पुण्यात राहत नाही. मी पुण्याचा नाहीये, मी सांगलीचा आहे," अशी प्रतिक्रिया बिचुकले यांनी दिली. ते एका व वृत्तवाहिनीशी बोलत होते.

या निवडणुकीत जनतेनं जे प्रेम दाखवलं ते मतांमध्ये का उतरलं नाही? असा प्रश्न विचारला असता बिचुकले म्हणाले, "हा जनतेचा प्रश्न आहे. तो माझा प्रश्न नाही. मला त्यांनी मत का नाही दिलं? असं जनतेला जाऊन विचारू शकत नाही. देशात राजेशाही असती तर त्यांना दाखवलं असतं. भारतात लोकशाही आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं आहे, तसं जगायला हवं."

लोक तुमच्या सोबत सेल्फी काढतात, पण मत देत नाहीत, याबाबत विचारलं असता अभिजीत बिचुकले पुढे म्हणाले, "मग मी लोकांना शिव्या देऊ का? लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मी निवडणूक लढत असतो. माझी शर्यत असून संपलेली नाही. कारण मी अजून जिंकलो नाही. आता २०२४ विधानसभा निवडणूक हे माझं पुढील मिशन आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news