बोगस जन्‍म प्रमाणपत्र प्रकरण : ‘सपा’ नेते आझम खान, मुलगा अब्दुल्ला आणि पत्नीला ७ वर्षांची शिक्षा

बोगस जन्‍म प्रमाणपत्र प्रकरण : ‘सपा’ नेते आझम खान, मुलगा अब्दुल्ला आणि पत्नीला ७ वर्षांची शिक्षा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क ; बोगस जन्‍म प्रमाणपत्र प्रकरणी समाजवादी पार्टीचे (सपा) नेते आझम खान, (Azam Khan ) त्‍यांची पत्‍नी तंजीन फातमा आणि मुलगा अब्दुल्ला आझम यांना रामपूर न्‍यायालयाने ७ वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी न्यायालयाने तिघांनाही दोषी घोषित केले होते. सपाचे माजी आमदार अब्दुल्ला आझम खान यांच्या दोन जन्म प्रमाणपत्र प्रकरणात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आज हा निकाल दिला. ( Two Birth Certificate Case )

Two Birth Certificate Case : काय होते प्रकरण ?

आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला यांच्‍याकडे दोन जन्म प्रमाणपत्रे असल्‍याचे आढळले होते. यामध्‍ये रामपूर नगरपरिषदेचे, तर दुसरे प्रमाणपत्र लखनौ महानगरपालिकेचे होते. या प्रकरणी २०१९ मध्ये स्मॉल इंडस्ट्रीज सेलचे तत्कालीन प्रादेशिक समन्वयक आणि भाजप आमदार आकाश सक्सेना यांनी गंज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. यामध्‍ये अब्‍दुल्‍ला यांच्‍यासह सपा नेते आझम खान आणि त्यांची पत्नी डॉ तनझिन फातमा यांनाही आरोपी करण्यात आले होते.तपासाअंती पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
३० साक्षीदार आणि कागदपत्रांच्‍या आधारे न्‍यायालयाने सुनावली शिक्षा

या खटल्‍याची सुनावणी रामपूर न्‍यायालयात झाली. सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचे प्रत्येकी १५ साक्षीदार हजर झाले होते. या खटल्यातील फिर्यादी आमदार आकाश सक्सेना यांच्यासह १५ साक्षीदारांचे जबाब फिर्यादीच्या वतीने न्यायालयात नोंदविण्यात आले, तर अब्दुल्ला आझम, आझम खान आणि डॉ. तनझिन फातमा यांनी त्यांच्या बचावात १५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. याशिवाय कायदेशीर तरतुदी तसेच उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्णयाचाही दाखला फिर्यादी पक्षाने दिला आहे. या ३० साक्षीदारांच्या आणि कागदोपत्री पुराव्याच्या आधारे न्यायालयाने हा निकाल दिला.

२०१७ मधील विधानसभा सदस्यत्व ठरवले होते रद्द

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान अब्दुल्ला यांनी दिलेल्या जन्मतारखेचा तपशीलाबाबतही उच्च न्यायालयात आव्हान देण्‍यात आले हाेते. या निवडणुकीच्या वेळी अब्दुल्ला आझम यांचे वय २५ वर्षांपेक्षा कमी होते.  त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी बनावट कागदपत्रे आणि शपथपत्र दाखल केल्‍याचा दावा करण्‍यात आला होता. शाळेतील गुणपत्रक आणि इतर कागदपत्रे आधार म्हणून वापरली गेली. सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने अब्दुल्ला यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करून निवडणूक रद्द ठरवली होती.

माजी सपा आमदार अब्दुल्ला आझम यांनी 2022 मध्ये सपाच्या तिकिटावर स्वार तांडा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवली आणि ते जिंकले; पण 14 फेब्रुवारी 2023 रोजी न्यायालयाने त्यांना मुरादाबादच्या 15 वर्षे जुन्या छजलत प्रकरणात दोषी ठरवले आणि शिक्षा सुनावली. त्यांना दोन वर्षांचा तुरुंगवास आणि 3,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, त्यानंतर त्यांना दुसऱ्यांदा आमदारकी गमवावी लागली होती.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news