बिग बॉस फेम Abdu Rozik ला ED चे समन्स

Abdu Rozik
Abdu Rozik

पुढारी ऑनलाईन डेस्क : तजाकिस्तानचे प्रसिद्ध गायक आणि अभिनेता अब्दू रोजिकचे नाव जगभरात आहे. बिग बॉस -१६चे सर्वात लोकप्रिय कंटेस्टेंट असलेले अब्दूचा एक चाहता वर्ग आहे. आता अब्दू चर्चेत आला आहे. (Abdu Rozik ) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्याचे नाव आले असून ईडीने १४ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी त्याला समन्स पाठवले होते. (Abdu Rozik)

रिपोर्टनुसार, अब्दूला मुंबई ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्याची चौकशी केली जाईल. पण अब्दुच्या वकिलांचे म्हणणे आहे की, अब्दूला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी साक्षीदार म्हणून हजर राहण्यासाठी बोलवण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण?

अब्दू रोजिक एक गायक, अभिनेता आणि बिझनेसमनदेखील आहे. अब्दूचे अनेक देशांमध्ये आलीशान रेस्टॉरेंट्स आहेत. बिग बॉस ६ मधून बाहेर येताच अब्दूने मुंबईमध्येही 'बुर्गिर' नावाचा एक आलीशान रेस्टॉरंट सुरु केलं होतं. रिपोर्ट्सनुसार, या रेस्टाँरेंटमध्ये दुसऱ्या कंपनीचे पैसे गुंतले आहेत. पण, असे म्हटले जात आहे की, ती कंपनी ड्रग्जचा व्यापार करते. या प्रकरणी ईडीने अब्दूला समन्स पाठवले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news