Aaradhya Bachchan : आराध्या पहिल्यांदाच दिसली बदललेल्या लूकमध्ये, शाळेतील व्हिडिओ

Aaradhya Bachchan
Aaradhya Bachchan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आराध्या बच्चन बॉलीवूड इंडस्ट्रीतील ती स्टार किड्स आहे, जिच्या नावाची खूप चर्चा होते. अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची कन्या आराध्या बच्चन नेहमीच लाईमलाईटचा भाग राहतो. आता सोशल मीडियावर महानायक अमिताभ बच्चन यांची नात आराध्याचा एक लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती आपल्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनात परफॉर्म करताना दिसते. पण, या परफॉर्मन्समध्ये तिचा लूक एकदम बदललेला दिसतोय.

संबंधित बातम्या-

समोर आला आराध्या बच्चनचा लेटेस्ट व्हिडिओ

आराध्या बच्चन मुंबईतील प्रसिद्ध धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकते. या शाळेत हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांची मुले देखील शिक्षण घेतात. शुक्रवारी या शा‍ळेत ॲन्युअल डे फंक्शनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या औचित्याने ऐश्वर्या रायची कन्या आराध्या बच्चनने स्कूल प्रोग्रॅममध्ये सहभाग घेतला. ती स्टेजवर एक प्ले परफॉर्म केला.

ग्लॅमर अलर्ट नावाचे एक ऑफिशियल इन्स्टाग्राम पेजवर आराध्याचा एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आराध्या ब्लॅक कलरच्या स्टायलिश ड्रेसमध्ये दिसते. आराध्याचा लूक या व्हिडिओमध्ये बदललेला दिसतो. सोशल मीडियावर तिच्या परफॉर्मन्सचे कौतुक होताना दिसत आहे. यावेळी ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन दिसले.

video-glamouralertofficial, aaradhyaraibachchanofficial insta वरून साभार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news