uniform covil code : समान नागरी कायद्याचे ‘आप’ कडून समर्थन

uniform covil code : समान नागरी कायद्याचे ‘आप’ कडून समर्थन

नवी दिल्ली, नवी दिल्ली : समान नागरी कायद्यावर आम आदमी पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम आदमी पक्षाने समान नागरी संहितेचे समर्थन केले आहे. एकीकडे काँग्रेस, टीएमसी, जेडीयूसह अनेक विरोधी पक्ष यूसीसीच्या विरोधात असताना दुसरीकडे मात्र आप'चे हे पाऊल विरोधी पक्षांसाठी धक्का मानले जात आहे. समान नागरी संहिता सर्वांच्या संमतीने लागू करावी, याबाबत सर्व पक्षांशी चर्चा करावी, असे आम आदमी पक्षाचे म्हणणे आहे.

आपचे नेते संदीप पाठक म्हणाले की, "आम्ही तत्वतः समान नागरी संहितेचे (UCC) समर्थन करतो. कारण, कलम ४४ सांगते की देशात समान नागरी कायदा असायला पाहिजे. म्हणूनच सर्व धर्म, राजकीय पक्ष आणि संघटनांशी व्यापक चर्चा करून यावर एकमत व्हायला हवे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी समान नागरी कायद्याची गरज का आहे, याबाबत सांगितले. भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "दोन कायद्यांनी देश चालवता येणार नाही. समान नागरी संहितेबाबत विरोधी पक्षांनी मुस्लिमांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे जाऊन वस्तुस्थिती समजून सांगावी."

यानंतर विरोधी पक्ष आणि मुस्लीम संघटनांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने रात्री उशिरा तातडीची बैठक घेतली. ही बैठक सुमारे तीन तास सुरू होती.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news