‘आप’ला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेची आशा

अरविंद केजरीवाल (संग्रहित छायाचित्र)
अरविंद केजरीवाल (संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मंगळवारी (२३ एप्रिल ) तुरुंगात इन्सुलिन मिळाले. त्यामुळे आम आदमी पक्षाने आनंद साजरा केला. "अरविंद केजरीवालांना बजरंगबलींचा आशिर्वाद मिळाला, तसेच संकटमोचक हनुमानजींमुळे लवकरच त्यांची तुरुंगातून सुटका होईल." असे ट्विट आम आदमी पक्षाने केले.

मंगळवारी (२३ एप्रिल) देशभरात हनुमान जन्मोत्सव साजरा झाला. याचदिवशी तिहार तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवालांना इन्सुलिन देण्यात आले. अरविंद केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण ३२० झाल्यामुळे तुरुंग प्रशासनाने त्यांना पहिल्यांदाच इन्सुलिन देण्याचा निर्णय घेतला. याअगोदर सोमवारी (२२ एप्रिल) केजरीवालांना इन्सुलिन मिळावे या मागणीची याचिका फेटाळण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना इन्सुलिन मिळाल्याने आम आदमी पक्षाने याला बजरंगबलीचा आशिर्वाद म्हटले आहे. तसेच अरविंद केजरीवाल हनुमानजींचे भक्त आहेत. संकटमोचक हनुमानजींमुळे त्यांची तुरुंगातून लवकरच सुटका होईल अशी आशाही आपच्या ट्विटमध्ये व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, अरविंद केजरीवालांना तिहार तुरुंगात इन्सुलिन आणि दररोज १५ मिनिटे डॉक्टरांचा सल्ला मिळावा या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचबरोबर अरविंद केजरीवालांना तुरुंगात इन्सुलिन मिळावे यासाठी आपच्या नेत्यांनी-कार्यकर्त्यांनी तिहार तुरुंगाबाहेर आंदोलनही केले होते. एवढे होऊनही त्यांची याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे आता हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशीच त्यांना तुरुंगात इन्सुलिन मिळाल्याने त्याचा संबंध आपने बजरंगबलींशी जोडला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news