सिसोदियांच्या अटकेविरोधात ‘आप’चा हल्लाबोल; राजधानीत अडीच हजार मोहल्ला,नुक्कड सभांचे आयोजन

सिसोदियांच्या अटकेविरोधात ‘आप’चा हल्लाबोल; राजधानीत अडीच हजार मोहल्ला,नुक्कड सभांचे आयोजन

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: सत्तावादी दृष्टिकोणाचा अंगिकार करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप निरंकुशतावाद सत्ता चालवत आहेत, असा आरोप करीत दिल्लीकरांना हे पटवून सांगण्यासाठी आम आदमी पक्षाने कंबर कसली आहे. या अनुषांगाने पक्षाने 'मायक्रो प्लनिंग' केले असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाने आपली प्रतिमा जनमानसात कायम ठेवण्यासाठी तसेच भाजपवर लक्ष साधण्यासाठी ही योजना आखल्याचे बोलले जात आहे.

राजधानी दिल्लीतील कथित आबकारी धोरणातील घोटाळयाप्रकरणात सीबीआयने आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांना अटक केली आहे. या अटकेविरोधात आप चे स्वयंसेवक रस्त्यावर जनजागृती करतांना दिसून येतील. आप ने राज्यभरात अडीच हजार 'नुक्कड सभां'चे आयोजन केले आहे. या आयोजनातून पक्ष भाजपच्या निरंकुशतावादसंबंधी सर्वसामान्यांना माहिती देतील. दिल्लीचे संयोजन गोपाल राय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मोदी सरकारद्वारे केंद्रीय तपास यंत्रणेच्या दुरूपयोगासंदर्भात दिल्लीकरांना माहिती देण्यासाठी मोहल्ला तसेच नुक्कड सभांचे आयोजन करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

भाजपचा खरा चेहरा उघडकीस आणण्यासाठी आज शुक्रवारपासून (दि.०३) दिल्लीतील सर्व ७० विधानसभा मतदरासंघात स्वयंसेवकांची बैठक आयोजित केली जाईल. उद्या, शनिवारपासून राज्य स्तरावर मोहल्ला सभा केल्या जातील. तर ६,७ मार्चला दिल्लीतील प्रत्येक मतदान केंद्रावर सभांचे आयोजन केले जाईल. दिल्लीतील प्रत्येक रहिवाशापर्यंत पोहचण्यासाठी १० मार्चला राज्यातील प्रत्येक मोहल्ल्यांमध्ये नुक्कड सभा आयोजित केल्या जातील अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news