AAP-Congress Alliance : गुजरातमध्ये आपचा ‘झाडू’ काँग्रेसच्या ‘हातात’! लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांची भाजपविरुद्ध आघाडी

AAP-Congress Alliance : गुजरातमध्ये आपचा ‘झाडू’ काँग्रेसच्या ‘हातात’! लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांची भाजपविरुद्ध आघाडी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : AAP and Congress Alliance : पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून विरोधी पक्षांची युती असलेल्या I.N.D.I.A. आघाडीची तिसरी बैठक या महिन्याच्या अखेरीस मुंबईत होणार आहे, मात्र या सगळ्यात आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. पक्षाचे राज्यप्रमुख इसुदन गढवी यांनी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली.

इसुदन गढवी म्हणाले की, आमचा पक्ष गुजरातमध्ये काँग्रेससोबत आघाडी करून लोकसभा निवडणूक लढवणार आहे, हा पक्षाचा मोठा निर्णय आहे. भाजपला I.N.D.I.A.ची भीती वाटत आहे. दोन्ही पक्ष किती जागा लढवणार याबाबत पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. याबाबत सविस्तर माहिती लवकरच देण्यात येईल. आम्ही एकत्ररित्या गुजरातच्या जनतेचे प्रश्न मांडू आणि भ्रष्टाचार संपवू.' (AAP and Congress Alliance)

आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष I.N.D.I.A. आघाडीचा भाग आहेत. मात्र, अगामी लोकसभा निवडणुकीतील आघाडीबाबत सुरू असलेली चर्चा अद्याप प्राथमिक टप्प्यावर आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये आप आणि काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुका जागावाटपाच्या सूत्रानुसार एकत्र लढवतील की नाही हे येणारा काळच सांगेल. (AAP and Congress Alliance)

दरम्यान, आपच्या नेत्याने अचानक केलेल्या घोषणेने काँग्रेसलाही धक्का बसल्याची चर्चा आहे. एकीकडे आपचे प्रदेशाध्यक्ष शक्तीसिंह गोहिल राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकाबाबत संसदेत भूमिका मांडत असतानाच दुसरीकडे गढवी यांनी केलेल्या विधानामुळे काँग्रेसचे नेतेही अवाक् झाले आहेत. मात्र काही वेळाने दिल्लीतून गोहिल यांची प्रतिक्रिया समोर आली आणि ते म्हणाले की, 'I.N.D.I.A.' ही केवळ नावाची आघाडी नाही. कुठला पक्ष किती जागांवर लढणार हा मुद्दा महत्त्वाचा नाही. जो ज्या जागेवर मजबूत आहे त्यानुसार आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरू,' असे त्यांनी स्पष्ट केले. पण काँग्रेस आणि आप जरी एकत्र आले तरी हे दोन्ही पक्ष मिळून भाजपला रोखू शकतील का? अशा प्रश्न जाणकरांनी उपस्थित केला असून येणा-या काळातच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल असे म्हणणे मांडले आहे.

गुजरात काँग्रेसचे प्रवक्ते मनीष दोशी म्हणाले की, मला नुकतेच आपच्या घोषणेची माहिती मिळाली आहे. इतर पक्षांसोबत जागावाटपाचा करार केंद्रीय नेतृत्वाने अंतिम केला आहे. निवडणूकपूर्व आघाडीबाबत निर्णय घेणे हा केंद्रीय नेतृत्वाचा विशेषाधिकार आहे. केंद्रीय नेतृत्वाला याबाबत सल्ला घ्यायचा असेल, तेव्हा राज्यातील नेते नव्या आघाडीच्या मुद्द्यावर चर्चा करून त्याचा अहवाल केंद्रीय नेतृत्वाला सादर करतील. गुजरात काँग्रेस राष्ट्रीय नेत्यांच्या सूचनांचे पालन करेल, असे त्यांनी सांगितले. (AAP and Congress Alliance)

कोणताही परिणाम होणार नाही : भाजप

भाजपने आपच्या घोषणेवर हल्लाबोल केला आहे. आम आदमी पक्ष ही काँग्रेसची 'बी टीम' आहे. या दोन्ही पक्षांमधील संभाव्य आघाडीचा सत्ताधारी भाजपवर कसलाही परिणाम होणार नाही, अशी टीका केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news