Aamir Khan : ‘लालसिंग चड्ढा’वरचा बहिष्कार पाहून आमिर खान ‘महाभारत’ करायला घाबरला?

Aamir Khan : ‘लालसिंग चड्ढा’वरचा बहिष्कार पाहून आमिर खान ‘महाभारत’ करायला घाबरला?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही वर्षांपूर्वी, आमिर खानबद्दल (Aamir Khan) बातमी आली होती की त्याला महाभारतावर चित्रपट बनवायचा आहे आणि तो त्यावर बराच काळ विचार करत आहे. आमिरने त्यावेळी आपल्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते की, कृष्णाव्यतिरिक्त त्याच्यावर कर्णाचा खूप प्रभाव आहे. तो कृष्ण आणि कर्ण यांच्यात गोंधळून जातो की त्याला पडद्यावर कोणते पात्र साकारायचे आहे. मात्र, बराच काळ या चित्रपटाच्या निर्मितीबाबतचे कोणतेही वृत्त नाही. आमिरचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. यादरम्यान आमिरने 'महाभारत'बद्दलही चर्चा केली.

'महाभारत' चित्रपटाची निर्मिती होईल?

आमिर खानने (Aamir Khan) 2018 मध्ये 'महाभारत'साठी राकेश शर्माचा बायोपिक सोडला. 'महाभारत'चे बजेट 1000 कोटींच्या आसपास असेल, असे वृत्त समोर आले होते. या ड्रीम प्रोजेक्टवर गलाट्टा प्लसशी बोलताना आमिर म्हणाला, 'जेव्हा तुम्ही महाभारतावर चित्रपट बनवत असता, तेव्हा तुम्ही फक्त चित्रपट बनवत नाही, तर तुम्ही यज्ञ करत असता. हा केवळ चित्रपट नाही तर बरेच काही आहे. म्हणूनच मी अजून त्यासाठी तयार नाही. मला ते करायला भीती वाटते. महाभारत तुम्हाला कधीही निराश करणार नाही पण तुम्ही महाभारताला निराश करू शकता.

आमिरचा ड्रीम प्रोजेक्ट…

आमिरने (Aamir Khan) याआधी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले होते की, 'महाभारतवर चित्रपट तयार करणे हा माझा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. तो खूप मोठा प्रकल्प आहे. जर मी आज ठरवले की हा चित्रपट बनवत आहे तर मला त्यासाठी 20 वर्षे द्यावी लागतील. त्यामुळे मला भीती वाटते. जर मी हो म्हणालो आणि ते बनवायचे ठरवले तर फक्त संशोधन करण्यासाठी आणि नंतर हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी पाच वर्षे लागतील.

अक्षय कुमारशी स्पर्धा

आमिर सध्या लाल सिंग चड्ढाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सोशल मीडियातून चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू आहे. यात आमिरशिवाय करीना कपूर, मोना सिंग आणि नागा चैतन्य यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. तर दुसरीकडे अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' हा सिनेमाही 'लाल सिंह चड्ढा'सोबत 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. या दोन्हींपैकी कोणता चित्रपट जास्त गल्ला जमवणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news