Aamir Khan New Look : मुलीच्या साखरपुड्यात असा कसा दिसला आमिर खान; लोक म्हणाले हा तर संजय मिश्रा…

Aamir Khan New Look : मुलीच्या साखरपुड्यात असा कसा दिसला आमिर खान; लोक म्हणाले हा तर संजय मिश्रा…
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : प्रदीर्घ रिलेशनशिपनंतर आमिर खानची मुलगी आयरा खानने अखेर तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपुडा उरकून घेतला. काही काळापूर्वी नुपूरने आयराला प्रपोज केले होते, ज्याचा एक व्हिडिओ आयराने तिच्या इन्स्टा हँडलवर शेअर केला होता. आता दोघे अधिकृतपणे एकमेकांचे झाले आहेत. आमिरने संपूर्ण कुटुंबासह या सेलिब्रेशनमध्ये भाग घेतला. (Aamir Khan New Look)

मुलीच्या एंगेजमेंटमध्ये आमिर खानच्या लूकची सर्वाधिक चर्चा झाली. आयराच्या साखरपुड्यातील आमिर खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याची आई झीनत हुसैन यांच्या सोबत साखरपुड्याच्या सोहळ्यात सहभागी होताना दिसत आहे. (Aamir Khan New Look)

वूम्प्लाच्या अधिकृत इन्स्टा हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये आमिरची आई व्हीलचेअरवर बसलेली दिसत आहे. आमिर मागून येतो आणि आई जवळ उभा राहून फोटोसाठी पोज देतो. आई-मुलाच्या बाँडिंगसोबतच आमिर खानच्या लूकची अधीक चर्चा यावेळी रंगली. (Aamir Khan New Look)

आमिर आपल्या मुलीच्या साखरपुड्यात कुर्ता-पायजामा घालून पोहोचला होता. त्याचा लूक खूपच साधा होता. शिवाय आमिरने त्याच्या मिशा आणि दाढीला रंग (डाय) दिला नाही. मात्र, आमिरची पांढरी मिशी-दाढी पाहून लोक त्याच्या वयावरही टोमणे मारताना दिसले. (Aamir Khan New Look)

व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'कुठल्या चित्रपटाच्या शूटिंगमधून आला आहे काय. हा तर बाबाजी वाटत आहे. तर दुसऱ्याने लिहले की याचे 'खरे वय दिसत आहे'.

आणखी एकाने आमिर खानची तुलना अभिनेता संजय मिश्रासोबत करताना लिहिले की, 'हा संजय मिश्रासारखा का दिसतोय?' अशा प्रकारे आमिरच्या व्हिडिओवर लोक प्रतिक्रिया देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news