पुढारी ऑनलाईन : बॉलीवूड स्टार अमिर खानने बुधवारी त्याच्या चुकीबद्दल सोशल मीडियावरून माफी मागितली. अभिनेता आमिर (Aamir Khan) खानने त्याच्या ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत, आपल्या चुकांची माफी मागितली आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती असे म्हणत आहे की, "जर कधीही मी कोणत्याही प्रकारे तुमचे मन दुखावले असेल तर मन, विचार आणि शरीराने सर्वांची माफी मागतो, असे या व्हिडिओत म्हटले आहे. आमीरने (Aamir Khan) हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडिया युजर्सही यावर वेगाने कमेंट करत आहेत, तसेच त्याच्या चुकाही मोजत आहेत.
2022 मध्ये आमीर खान बॉलीवूडपासून दूर गेलेला दिसत आहे. पाठोपाठ त्याचे अनेक चित्रपट हे फ्लॉप होत आहेत. आमीर खानची अलीकडिल चित्रपट लालसिंह चड्ढा हा देखील फ्लॉप ठरला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या वादात सापडलेल्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये आमिर खानचा (Aamir Khan) हा चित्रपट आडकला आहे. आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट फ्लॉप झाल्यावर आमिरबद्दल विविध घटना समोर आल्या आहेत. या सर्व गोष्टींना पूर्णविराम देत आमिरची ही पहिली प्रतिक्रिया आली आहे.