अंगावर वीज कोसळून तरुणाचा मृत्यू; इंदापूर तालुक्यातील काटी येथील घटना

अंगावर वीज कोसळून तरुणाचा मृत्यू; इंदापूर तालुक्यातील काटी येथील घटना

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : वीज कोसळून काटी (ता. इंदापूर) गावातील भरतवाडी येथील एका २२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ओंकार दादाराम मोहिते असे या तरुणाचे नाव आहे. तो आपल्या शेतामध्ये कामानिमित्त गेला होता. याच दरम्यान रात्री उशीरा वीज कोसळली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात इंदापूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वीज पडल्यानंतर इंदापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारसाठी त्याला दाखल करण्यात आले, मात्र डाॅक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. त्याच्यापासून जवळच अंतरावर असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील एका नारळाच्या झाडावर देखील वीज पडली असून ते झाड जळाले आहे. मयत ओंकारचा टी शर्ट देखील जळालेल्या अवस्थेत मिळून आला. या संदर्भात तुकाराम भिवा मोहिते यांनी यांनी इंदापूर पोलिसात खबर दिली आहे.

काटी येथील मोहितेवस्ती येथे राहणाऱ्या दादाराम महादेव मोहिते यांना ओंकार हा एक मुलगा आणि दोन मुली आहेत. ओंकार हा पोलीस भरतीची तयारी करत होता. शांत, संयमी आणि हुशार मुलगा असल्याने त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news