नेवासा : कुंपनात सोडलेल्या वीजप्रवाहाने तरुण शेतकर्‍याचा घेतला जीव

file photo
file photo

नेवासा : मका पिकाभोवती तारेचे कुंपन बांधून जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी त्यात सोडलेल्या वीज प्रवाहाचा धक्का बसून तरुण शेतकर्‍याचा मृत्यू झाला. ही घटना नेवासा तालुक्यातील जळके खुर्द येथे घडली. या प्रकरणी दोन शेतमालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजीज महंमद पठाण (वय 33, रा. जळके खुर्द) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. याबाबत मन्सूर महंमद पठाण यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी (दि.26) दुपारी मन्सूर यांचा मोठा भाऊ अजीज हा गावच्या शिवारात उसाच्या पिकास पाणी देण्यासाठी गेला होता.

त्याच्याशी फोनवर संपर्क न झाल्याने मन्सूर त्याला पाहण्यासाठी दुपारी साडेतीन वाजता शेतात गेला. मात्र, भाऊ शेतात दिसला नाही. मन्सूर हा त्याचा चारीने शोध घेत गेला. त्यावेळी त्याला अशोक पंढरीनाथ काळे यांच्या शेतातील मक्याच्या बांधावर भाऊ अजीज पडलेला दिसला. मका पिकाचे शेतमालक अमोल अशोक काळे व प्रवीण अशोक काळे (दोघे रा. जळका बुद्रुक) यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news