Anushka-Virat : अनुष्का कार्यक्रमात पडणार तेवढ्यात विराटनं असं काय केलं की…

Anushka-Virat
Anushka-Virat

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स २०२३ मधील भव्य सोहळ्यास बॉलिवूड कलाकारंसोबत क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. या सोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अनुष्का शर्मा, उर्वशी रौतेला, रिया चक्रवर्ती याच्यासोबत अनेक स्टार्स दिसले. दरम्यान प्रत्येकांनी पॉपाराझीच्या कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हॉट पोझ दिल्या. तर, यावेळच्या अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ( Anushka-Virat ) यांच्या व्हिडिओने चर्चेला उधान आलं आहे.

इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स २०२३ च्या सोहळ्यात विराट कोहलीसोबत अनुष्काही पोहोचली होती. यावेळी अनुष्का जांभळ्या कलरच्या वनपीसमध्ये ग्लॅमरस तर विराट ब्लॅक कलरच्या शूटमध्ये हॅडसम दिसला. अनुष्का – विराट एका कारमधून उतरतात आणि एकमेंकाच्या हातात हात घालून कॅमेऱ्यासमोरून आतमध्ये प्रवेश करतात. दरम्यान दोघांनी पॉपाराझीच्या कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हॉट पोझज् दिल्या.

दरम्यान अनुष्का विराटसोबत ( Anushka-Virat ) रेड कार्पेटवर चालत जात असताना तिचा ड्रेस पायात अडकून पडण्याची शक्यता असते. म्हणून लगेच विराट खाली वाकतो आणि अनुष्काचा ड्रेस हाताना धरतो. नंतर अनुष्का पुढे जाताना दिसतेय. दरम्यान विराट अनुष्काच्या पायात ड्रेस अडकू नये म्हणून पतीची काळजी करताना दिसतोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी दोघांचे भरभरून कौतुक करत कॉमेन्टचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : 

(video: manav.manglani instagram वरून साभार)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news