Telangana | भाजपला मत देणार म्हटल्यावर काँग्रेस उमेदवारानं महिलेच्या कानाखाली मारलं, व्हिडिओ व्हायरल

Telangana | भाजपला मत देणार म्हटल्यावर काँग्रेस उमेदवारानं महिलेच्या कानाखाली मारलं, व्हिडिओ व्हायरल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे एक उमेदवार वादात सापडले आहेत. तेलंगणातील (Telangana) निजामाबाद लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार टी. जीवन रेड्डी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या एका कथित व्हिडिओमध्ये निजामाबादचे काँग्रेसचे खासदार उमेदवार टी. जीवन रेड्डी (T. Jeevan Reddy) एका शेतकरी महिलेच्या कानशिलात मारताना दिसतात.

निवडणूक प्रचारादरम्यान जीवन रेड्डी यांच्यासमोर एक महिला येऊन उभी राहते आणि तिने येत्या १३ मे रोजी होणाऱ्या मतदानादिवशी फुल चिन्हाला मत देणार असल्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर रेड्डी हे त्या महिलेला कानशिलात मारतात. निवडणूक प्रचारादरम्यान घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

सदर महिला ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजूर म्हणून काम करते. अरमूर विधानसभा क्षेत्रातील एका गावात ही घटना घडली, जिथे काँग्रेस उमेदवार टी. जीवन रेड्डी इतर नेत्यांसोबत प्रचार करत होते.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत यापूर्वी काँग्रेसला मतदान केलेल्या या महिलेने पेन्शन न मिळाल्याचे सांगत आपला असंतोष व्यक्त केला. अरमूरमधून विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले विनय कुमार रेड्डी हे घटनेच्या वेळी टी. जीवन रेड्डी यांच्यासोबत होते.

'ते केवळ प्रेमाने होते…'

दरम्यान, व्हायरल झालेल्या त्या कथित व्हिडिओवर काँग्रेस उमेदवार जीवन रेड्डी यांनी खुलासा केला आहे. "ते केवळ प्रेमाने होते…" असे त्यांनी म्हटले आहे.

महिला काय म्हणाली?

"माझ्याकडे घर नाही आणि मला पेन्शनही मिळत नाही. मी त्यांना (निजामाबादचे काँग्रेसचे उमेदवार जीवन रेड्डी) माझ्यावर दया दाखवा, असे सांगितले. मग त्यांनी मला आश्वासन दिले की, "दोरासानी (queen) तुला ते मिळेल". हे सांगण्यासाठी त्यांनी मला कानाखाली मारल्यासारखे केले. यामुळे माझी बदनामी होत नाही का?", असे शेतकरी महिलेने म्हटले आहे.

अरमूर हा निजामाबाद लोकसभा मतदारसंघातील ७ विधानसभा क्षेत्रांपैकी एक आहे. सध्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे विद्यमान खासदार धर्मपुरी अरविंद यांच्या विरोधात काँग्रेसने टी. जीवन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news