Odisha News : फक्त आठशे रुपयांना विकला पोटचा गोळा

Odisha News : फक्त आठशे रुपयांना विकला पोटचा गोळा

भुवनेश्वर : गरिबीला कंटाळून ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात एका आदिवासी महिलेने आपल्या 8 महिन्यांच्या मुलीला अवघ्या 800 रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. करामी मुर्मू असे या महिलेचे नाव आहे. तिला आधीच एक मुलगी होती. दुसर्‍या मुलीच्या जन्माने तिला आनंद झाला नाही. महिलेने पती मुसू याच्यापासून लपवून मुलीचा सौदा केला.

हा प्रकार पतीला समजताच त्याने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी आईसह तिघांना अटक केली आहे. हे आदिवासी जोडपे बिप्रचरणपूर गावात राहते. घरची आर्थिक परिस्थिती ठिक नाही. महिलेला दुसरी मुलगी झाल्यानंतर तिला काळजी वाटू लागली. तिने शेजारी असलेल्या माही मुर्मूला सांगितले की, ती बाळ वाढवण्यास सक्षम नाही. माही ही महिला मध्यस्थ म्हणून काम करते. तिला बाळासाठी एक खरेदीदार सापडला. रक्कम निश्चित झाल्यावर करामीने तिची आठ महिन्यांची मुलगी फुलमणी आणि अखिल मरांडी यांच्याकडे सोपवली. याप्रकरणी मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news