देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य घट

देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य घट
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य घट नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी दिवसभरात ९ हजार ५२० कोरोनाबाधितांची भर पडली. तर, ४१ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान, १२ हजार ८७५ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. शनिवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.६२ टक्क्यांवर पोहोचला. तर, दैनंदिन कोरोना संसर्गदर २.५० % आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर २.८० % नोंदवण्यात आला.

देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४ कोटी ४३ लाख ९८ हजार ६९६ पर्यंत पोहोचली आहे. यातील ४ कोटी ३७ लाख ८३ हजार ७८८ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, ८७ हजार ३११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने आतापर्यंत ५ लाख २७ हजार ५९७ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत २११ कोटी ३९ लाख ८१ हजार ४४४ डोस देण्यात आले आहेत. यातील ९४.१५ कोटींना दुसरा डोस देण्यात आला आहे. तर, खबरदारी म्हणून आतापर्यंत १४ कोटी ९८ लाख ३२ हजारांहून अधिक बूस्टर डोस देण्यात आले आहेत.

देशात आतापर्यंत ८८.४७ कोटी कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ३ लाख ८१ हजार २०५ कोरोना तपासण्या शुक्रवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या ११,८२७ सक्रिय कोरोनाबाधित आहे. यातील सर्वाधिक सक्रिय कोरोनाबाधित मुंबईत असून ही संख्या ५ हजार ३९२ आहे. मुंबई खालोखाल ठाण्यात सक्रिय रुग्णसंख्या ही २ हजार ३६८ नोंदवण्यात आली आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news