भारतातील ‘या’ भागात कोणत्याही क्षणी होऊ शकतो तीव्र भूकंप’, शास्त्रज्ञाचा दावा

Earthquake
Earthquake

पुढारी ऑनलाईन: नजिकच्या काळात उत्तराखंडसह, हिमाचल प्रदेश आणि नेपाळच्या पश्चिम भागात तीव्र भूकंप होण्याची शक्यता असल्याचा दावा नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एन. पूर्णचंद्र यांनी केला आहे. पुढच्या काही दिवसात कोणत्याही क्षणी हिमालयीन प्रदेशातील काही भागात तीव्र भूकंपाचे धक्के बसणार असून, नागरिकांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे.

याविषयी स्पष्टीकरण देताना, शास्त्रज्ञ डॉ. एन. पूर्णचंद्र म्हणाले की, भारतीय हिमालयीन टेक्टॉनिक प्लेटची दरवर्षी सुमारे पाच सेंमीने हालचाल होत असते. त्यामुळे हिमालययीन पर्वतांवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो आणि याठिकाणी भूकंप होण्याची दाट शक्यता  निर्माण होत असल्याचे या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. अशीच परिस्थिती पुढच्या काही दिवसात निर्माण होऊन, यामुळे भूकंप होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पृथ्वीच्या पृष्ठभागावर अनेक प्लेट्सची हालचाल होत असल्याने सतत दाब निर्माण होत असतो. भारतीय टेक्टॉनिक प्लेटसची सातत्याने दरवर्षी पाच सेंमीने हालचाल होत असते, त्यामुळे हिमालयावर दबाव निर्माण होऊन भूकंप होण्याची शक्यता दाट वाढत असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news