बारामती : व्याजाच्या पैशावरून सावकाराने केला महिलेचा विनयभंग

बारामती : व्याजाच्या पैशावरून सावकाराने केला महिलेचा विनयभंग
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा : व्याजाने दिलेल्या पैशाच्या कारणावरून महिलेच्या घरात अनाधिकाराने प्रवेश करून सावकाराने  विनयभंग केल्याचा प्रकार कोरहाळे बुद्रूक (ता. बारामती) येथे घडला. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी संतोष दिनकर खोमणे (रा. कोऱहाळे बुद्रूक) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कोऱहाळे येथील एका महिलेने याबाबत फिर्याद दिली. गुरुवारी 18 ऑगस्ट रोजी  सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

फिर्यादीला वीटभट्टी व्यवसायासाठी एक लाख रुपयांची गरज होती. त्यामुळे तिच्या पतीने संतोष खोमणे यांच्याकडून एक लाख रुपये व्याजाने घेतलेले होते. त्याच्या व्याजाची रक्कम ते वेळोवेळी देत होती. तरीही खोमणे यांच्याकडून फिर्यादीच्या पतीकडे वेळोवेळी व्याजाच्या पैशाची मागणी केली जात होती.  गुरुवारी त्यांनी फिर्यादीच्या घरात अनाधिकाराने प्रवेश करत तिला पाठीमागून दोन्ही हातांनी धरत जवळ ओढत तिचा विनयभंग केला. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता डाव्या गालावर चापट मारून केस ओढले. फिर्यादीला सोडविण्यासाठी पती व पुतण्या आले असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून हाताने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news