पुण्यात उभारणार आधुनिक क्रीडासंकुल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

devendra fadanvis
devendra fadanvis
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पोलिस महासंचालकांनी क्रीडासंकुलाचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार, पुण्यात आधुनिक पद्धतीचे तसेच सर्व सुविधा असणारे क्रीडासंकुल आणि क्रीडा हॉस्टेल तयार करण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वानवडी येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक दोन (एसआरपीएफ) येथे सुरू असणार्‍या 33 व्या महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धा 2023 च्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना फडणवीस यांच्या हस्ते बक्षीसदेखील देण्यात आले.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ, पोलिस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, 'पोलिस दलातील खेळाडूंसाठी जास्तीत जास्त स्पर्धा झाल्या पाहिजेत. तसेच, त्यांना ट्रेनिंगदेखील चांगल्याप्रकारे मिळाले पाहिजे. त्यासोबतच त्याला अनुरूप वातावरण आणि सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी हे संकुल असेल. कोरोनामुळे ही स्पर्धा घेता आली नव्हती. यंदा ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली असून, खेळांडूमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला. महाराष्ट्र पोलिस दलाकडे देशातील सर्वोत्तम पोलिस दल म्हणून पाहिले जाते.

अनेक चांगल्या परंपरा महाराष्ट्र पोलिस दलाने कायम ठेवल्या आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी व लोकशाहीचे मूल्य जपण्यासाठी पोलिस दल सातत्याने कार्य करत आहे. विशेष करून अत्यंत विपरीत परिस्थितीत पोलिस अधिकारी व कर्मचारी काम करतात. कोरोनाच्या काळात महाराष्ट्राने हा अनुभव घेतला. जिवाची जोखीम पत्करून पोलिसांनी या काळात काम केले. आमचे काही पोलिस बांधव शहीद झाले. परंतु, अशाही परिस्थिती त्यांनी सामान्य माणसांचे जीवन सुखकर झाले पाहिजे यादृष्टीने काम केले आहे.'

पोलिस दल महाराष्ट्रात अतिशय उत्तमप्रकारे कायदा सुव्यवस्था राखत आहे. म्हणून महाराष्ट्र सातत्याने प्रगतीकडे जात आहे. सर्व कसोटीत पोलिस दल यशस्वी आहे. त्यामुळे आमच्या पोलिस दलाच नाव संपूर्ण भारतात घेतले जाते, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या गोष्टींत याबाबत सातत्याने उल्लेख केला जातो. पोलिस दलातील जे क्रिडापटू आहेत त्यांच्यासाठी या स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या गुणांना वाव मिळतोच पण, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर मेडल्स मिळवत आहेत. त्यामुळे पोलिस दल, राज्य आणि देशाचे नाव मोठे होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news