Fountain of Youth : सहा रसायनांचे मिश्रण पुन्हा बनवणार तरुण?

सहा रसायनांचे मिश्रण पुन्हा बनवणार तरुण?
सहा रसायनांचे मिश्रण पुन्हा बनवणार तरुण?

न्यूयॉर्क : हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी सहा अशा रसायनांचा छडा लावला आहे जे वृद्ध लोकांना पुन्हा एकदा तरुण बनवू शकतात. 'एजिंग' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. 'केमिकली इड्यूस्ड री-प्रोग्रॅमिंग टू रिव्हर्स सेल्युलर एजिंग' असे या स्टडीचे नाव आहे. त्यानुसार सहा रसायनांना एकत्र करून 'फाऊंटन ऑफ यूथ' नावाचे औषध बनवले जाईल. या औषधामुळे वय घटत जाईल आणि त्वचा पुन्हा एकदा तरुण व सतेज दिसू लागेल. सहा रसायनांच्या या मिश्रणाला 'केमिकल कॉकटेल' म्हटले जात आहे.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार हे कॉकटेल एकाच आठवड्यात मानवी त्वचेच्या ऊतींमध्ये म्हणजेच पेशींच्या समूहांमध्ये वय वाढण्याची प्रक्रिया अनेक वर्षांनी मागे फिरवू शकेल. केवळ चारच दिवसांच्या ट्रिटमेंटमुळे लोक तीन वर्षांनी तरुण होऊ शकतात. डेव्हीड सिंक्लेयर यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की यापूर्वी करण्यात आलेल्या संशोधनांवरून असे दिसून आले होते की जीन थेरपीच्या माध्यमातून एंबि—योटिक जीनला सक्रिय केल्याने वय घटवले जाऊ शकते.

आता नव्या संशोधनातून समजले की केमिकल कॉकटेलनेही हे शक्य आहे. संपूर्ण शरीराचा कायाकल्प करण्यासाठी हे एक यशस्वी पाऊल ठरू शकते. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधकांनी याबाबतचा प्रयोग उंदरांवर केला आहे. तसेच मानवी पेशींवरही हा प्रयोग करून पाहण्यात आला. त्यामधून असे दिसून आले की या मिश्रणामुळे वय मागे फिरू शकते.

वयामध्ये झालेल्या या बदलांना मानव आणि उंदरांच्या ट्रान्सक्रिप्टोमिक क्लॉकच्या माध्यमातून ट्रॅक करण्यात आले. हे क्लॉक बायोलॉजिकल एज (जैविक वय) जीन एक्स्प्रेशन डेटाचा वापर करते. या केमिकल कॉकटेलची मानवावरील चाचणी पुढील वर्षी केली जाणार आहे. या औषधाने कमजोर द़ृष्टीतही सुधारणा होईल असा डेव्हिड सिंक्लेयर यांचा दावा आहे. वयाशी निगडीत अनेक आजारांशी लढण्यासाठी तसेच आयुष्य वाढवण्यासाठीही हे औषध उपयुक्त ठरेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news