kolhapur zilla bank : कोल्हापूर जिल्हा बँक : नेत्यांच्या बैठकीकडे लागले लक्ष

kolhapur zilla bank : कोल्हापूर जिल्हा बँक : नेत्यांच्या बैठकीकडे लागले लक्ष

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा बँकेत (kolhapur zilla bank) किमान १० जागांचा तिढा कायम आहे. आता छाननी पूर्ण झाल्याने प्रमुख नेते मंडळींची बैठक होणार आहे. दोन दिवसांत होणार्‍या बैठकीनंतर माघारीचा निरोप धाडला जाणार आहे. आपला निभाव लागणार की पत्ता कट होणार, याची धाकधूक इच्छुकांना लागली आहे.

भाजप आघाडी, जनसुराज्य, आ. प्रकाश आवाडे, माजी खा. राजू शेट्टी, माजी आ. महादेवराव महाडिक आदी सर्वांना सोबत घेऊन बँकेची निवडणूक पार पाडण्याचे धोरण ठरले आहे.

आ. पी. एन. पाटील यांनी समन्वयक म्हणून घेतलेल्या बैठकीत आ. विनय कोरे आणि आ. आवाडे यांनी सत्ताधारी आघाडीला साथ देण्याची ग्वाही दिली आहे. तालुक्यातील बहुतांश निवडी आणि लढतींचेही चित्र स्पष्ट आहे.

उर्वरित नऊ जागांवर कोण कुठे लढणार? कोण बिनविरोध होणार, याबाबत उत्सुकता आहे.

विकास संस्था सोडून इतर जागांवर रस्सीखेच असून, १६७ उमेदवार रिंगणात आहेत. कृषी प्रक्रिया, बँक-पतसंस्था, महिला राखीव, अनुसूचित जाती, ओबीसी, भटक्या जाती, दूध संस्था गटातील या जागांसाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे.

लवकरच पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आ. पी. एन. पाटील, आ. विनय कोरे, राजू शेट्टी, महादेवराव महाडिक यांच्यात एकत्रितपणे तसेच स्वतंत्रपणे बैठका होणार आहेत. त्यानंतरच उर्वरित जागांवरील उमेदवारी आणि माघार कोण घेणार, हे स्पष्ट होईल.

kolhapur zilla bank : तालुका गटातून माघारीस सुरुवात

ज्या तालुक्यातून उमेदवार आणि विजयाचे पक्के गणित समोर आहे. अशा तालुक्यांतून इतर उमेदवार माघार घेतील. डमी अर्ज भरलेल्या उमेदवारांची पहिल्या टप्प्यातच माघार होईल. नेत्यांच्या बैठकीनंतर माघारीसाठी गती येणार आहे. तत्पूर्वी, तालुका गटातील उमेदवारांची माघार सुरू होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news