Yawatmal News : अपमानास्पद वागणूक; घरजावयाने केली पत्नी सासऱ्यासह दोन मेहुण्यांची हत्या

file photo
file photo

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : अपमानास्पद वागणूक मिळत असलेल्या घरजावयाने स्वतःच्या पत्नीसह सासरा व दोन मेहुणे यांची सबलाने हल्ला करून झोपेत हत्या केली. या हल्ल्यात सासू गंभीर जखमी आहे. जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्यावर मंगळवारी मध्यरात्री हा थरार घडला. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

सासरा पंडित घोसले, मेहुणा ज्ञानेश्वर घोसले आणि सुनील घोसले, पत्नी रेखा गोविंद पवार अशी मृतांची नवे आहेत. सासू रुखमा घोसले या गंभीर जखमी असून त्यांच्यावर यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

आरोपी गोविंद विरचंद पवार हा लग्नानंतर पत्नी रेखा सोबत सासुरवाडीला राहत होता. त्याला येथे सतत अपमानास्पद वागणूक मिळत होती. यामुळेच दुखावलेल्या गोविंदने मंगळवारी मध्यरात्री सूड उगवला. तिरझडा गावात घरी झोपून असलेल्या पत्नी व एका मेहुण्याची हत्या केली. नंतर शेतात झोपलेल्या सासरा व दुसरा मेहुणा यांच्यावर सबलाने प्रहार केले. यावेळी सासू थोडक्यात बचावली, मात्र तिची प्रकृती गंभीर आहे.

कळंब पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक दीपमाला भेंड यांनी गोविंद पवार यास अटक केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news