Supreme Court : राष्ट्रीय पुरुष आयोगाच्या स्थापनेबाबत सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

Manipur Violence: सर्वोच्च न्यायालय
Manipur Violence: सर्वोच्च न्यायालय

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय पुरुष आयोगाच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात ३ जुलै २०२३ रोजी सुनावणी होणार आहे. अधिवक्ता महेश कुमार तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे. विवाहित पुरुषांच्या जीवन संपवण्याच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या याचिकेत 'नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो'ने जाहीर केलेली माहिती देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटनुसार, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सोमवारी (दि.३) सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याचिकाकर्ते महेश कुमार तिवारी यांनी याचिका दाखल करताना नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीचा हवाला दिला आहे.

पुरुषांमध्ये जीवन संपवण्याचे प्रमाण जास्त

महेश कुमार तिवारी यांनी एनसीआरबीच्या आकडेवारीचा हवाला देताना म्हटले की, "वर्ष २०२१ मे कौटुंबिक समस्यांमुळे ३३.२ टक्के पुरुषांनी विवाह विषयक कारणांमुळे जीवन संपवण्याचे प्रमाण आहे. विवाहित पुरुषांच्या आत्महत्येचा प्रश्न हाताळण्यासाठी आणि घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या पुरुषांच्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला निर्देश देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news