पुढारी ऑनलाईन : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चाहता वर्ग मोठा आहे. केवळ देशातील नव्हे तर जगभरातील चाहते त्याचा अभिनय आणि स्टाईलवर फिदा आहेत. दरम्यान, कर्नाटकातील त्याच्या चाहत्यांनी कहर केला आहे. 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनचा चाहता असल्याचा दावा करणाऱ्या अर्धा डझनहून अधिक तरुणांच्या एका गटाने त्यांच्या एका मित्रावर कथितपणे हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कारण त्याने दुसऱ्या एका टॉलिवूड अभिनेत्याचा चाहता असल्याचे सांगितले. बंगळूर जवळील केआर पूरमजवळील एका क्रीडांगणावर रविवारी दुपारी ही घटना घडली. (Allu Arjun Fans)
पोलिसांनी सांगितले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना या घटनेची माहिती मिळाली. युवक क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात जमले होते. ज्याला मारहाण झाली तो अल्लू अर्जुनला गेल्या काही महिन्यांपासून ट्रोल करत होता. क्रिकेट सामन्यादरम्यान दोन्ही गटांमध्ये या मुद्द्यावरून वादावादी झाली.
एका हल्लेखोर तरुणाने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये, हल्लेखोर वारंवार जखमी तरुणाला 'जय अल्लू अर्जुन' म्हणल्याशिवाय तुला सोडणार नाही असे म्हणत आहेत. त्याला बेदम केल्यामुळे तो रक्तबंबाळ झाल्याचे दिसते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तरुणांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याने कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. कारण ते सर्वजण मित्र आहेत आणि त्यांच्यामधील भांडण मिटवले आहे.
जेव्हा एकाने 'जय अल्लू अर्जुन' म्हणण्यास नकार दिल्यानंतर रस्त्यावर ही मारामारी झाली. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी त्याला मारहाण केली. सध्या अल्लू अर्जुन विशाखापट्टणममध्ये 'पुष्पा २: द रुल'चे शूटिंग करत आहे आणि 'एके २२'साठी त्रिविक्रम श्रीनिवाससोबत काम करण्याची योजना आखत आहे.
अल्लू अर्जुन 'पुष्पा २ द रुल'च्या शूटिंगसाठी विशाखापट्टणममध्ये आल्यानंतर त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. त्याने यावेळी ऑलिव्ह ग्रीन शर्ट आणि ब्लॅक डर्गोज परिधान केला होता. त्याला 'पुष्पा'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 'पुष्पा'चा तिसरा सिक्वेल असू शकतो आणि त्यात फहाद फासिल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या भूमिका आहेत. (Allu Arjun Fans)
हे ही वाचा :