धोक्याचा इशारा! : मिनिटाला घटत आहे 11 फुटबॉल मैदानांइतके वन क्षेत्र

Deforestation
Deforestation
Published on
Updated on

न्यूयॉर्क : वाढत्या तापमानामुळे गेल्या काही वर्षांत जगभरातील जंगलांना लागणार्‍या आगींच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे जगभरातील मोठे जंगल क्षेत्र खाक झाले आहे. याबरोबरच 2.7 गीगाटन इतके कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित झाले. या डिफॉरेस्टेशनमध्ये जगात ब्राझील हा देश आघाडीवर आहे. Deforestation

'ग्लोबल फॉरेस्ट वॉच' या संघटनेने केलेल्या अभ्यासानुसार, क्लाईमेट समीट सीओपी 26 मध्ये करण्यात आलेले अनेक वादे पूर्ण होताना दिसत नाहीत. याचे उदाहरण द्यावयाचे झाल्यास गेल्यावर्षी स्वित्झर्लंडच्या आकाराचे जंगल तोडले गेले. थोडक्यात सांगायचे झाल्यास, जगात प्रत्येक मिनिटाला 11 फुटबॉल मैदानांइतके वन क्षेत्र कमी होत आहे. गंभीर बाब म्हणजे, ब्राझीलमध्ये असलेली घनदाट जंगले एकूण ऑक्सिजनमधील मोठा भाग पुरवत असतात. मात्र, दुर्दैवाने हाच देश जंगलतोडीत जगातच अव्वल स्थानावर आहे; तर जंगतोडीचा वेग इंडोनेशियात सर्वात कमी आहे.Deforestation

ग्लासगोमध्ये 2021 मध्ये झालेल्या सीओपी 24 क्लाईमेट समीटमध्ये झाडे 2030 पर्यंत तोडण्यापेक्षा अधिकाधिक झाडे लावण्यावर एकमत झाले होते. जंगलाशी संबंधित या करारावर जगभरातील सुमारे 100 देशांच्या नेत्यांनी स्वाक्षरी केली होती. याच देशांत जगातील सुमारे 85 टक्के वन क्षेत्र आहे. 2014 मध्ये जंगलासंबंधी करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय करार अपयशी ठरला होता. याबरोबरच 2021 मध्ये करण्यात आलेला करारही अपयशी ठरण्याची शक्यता बळावत चालली आहे. गंभीर बाब म्हणजे जून 2022 मध्ये म्हणजे एका महिन्यात अनेक कारणांमुळे 1,120 चौरस कि.मी. वन क्षेत्र नष्ट झाले होते. यामुळेच तापमानात भर पडत आहे.Deforestation

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news