पुढारी ऑनलाईन डेस्क : 12th Fail फेम आणि बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी ( Vikrant Massey ) याच्या घरी एक नव्या आणि गोंडस पाहुण्याचे आगमन झाले आहे. विक्रांत सध्या बाबा झाला असून पत्नी शीतल ठाकूरने ७ फेब्रुवारी रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ही आनंदाच्या माहिती दोघांनी सोशल मीडियावर देताच नेटकऱ्यांनी कपलचे भरभरून कौतुक केलं आहे.
संबंधित बातम्या
अभिनेता विक्रांत मेस्सी ( Vikrant Massey ) आणि शीतल ठाकूरने त्याच्या इंन्स्टाग्रामवर नुकतेच याबाबतची माहिती देताना फोटो शेअर केलाय. या फोटोत कपलच्या हातात गोंडस बाळाचा हात आणि खालच्या बाजूस बेबी स्ट्रोलर स्पष्टपणे दिसत आहे. याशिवाय ७ फेब्रुवारी २०२४ रोजी मुलगा झाला असून आम्ही आई-बाबा बनल्याची माहिती दिली आहे. आणखी एका फोटोत विक्रांत शीतलचे अबिनंदन करत दोघेजण एकमेंकासोबत फोटोत दिसत आहे. यामुळे दोघा कपलच्या घरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
"आता आम्हीदेखील एक कुटुंब आहोत, आम्हा दोघांच्या विश्वात आम्ही आमच्या मुलाचे स्वागत करत आहोत अन् ही माहिती देताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. तुमचेच शीतल व विक्रांत." अशी फोटोला कॅप्शन दोघांनी लिहिली आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी दोघांचे भरभरून कौतुक करताना कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय.
काही वर्षे डेट केल्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये विक्रांतने शीतलबरोबर लग्न केलं आहे. त्यानंतर २४ सप्टेंबर २०२३ रोजी त्याने याबाबतची गुजन्यूज दोत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.
वर्क्रफंन्टबद्दल बोलाचये झाल्यास, विक्रांतला 'मिर्जापूर' या वेबसीरिजमुळे लोकप्रियता मिळाली. विक्रांतच्या करिअरची सुरुवात टीव्ही मालिकेपासून झाली होती. तर ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात विक्रांतच्या '12th fail' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही जाहीर झाला. हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. याशिवाय तो एकता कपूरच्या 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटात लवकरच दिसणार आहे.