छगन भुजबळ,www.pudhari.news
छगन भुजबळ,www.pudhari.news

एक मुख्यमंत्री दादागिरी करतो आणि आम्ही शांत राहतो? भुजबळांचा राज्य सरकारला सवाल

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील जत तालुक्यावर आपला दावा केला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रातील जत तालुक्यावर आपला दावा करणा-या कर्नाटकचे मु्ख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा छगन भुजबळ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. नाशिक येथे माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचा दावा म्हणजे चोराच्या उलट्या बोंभा असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. एक मुख्यमंत्री दादागिरी करतो आणि आम्ही शांत उभे राहतो असा सवाल राज्यसरकारला छगन भुजबळ यांनी केला आहे. बोम्मई यांना वेळीच आवरण्याची गरज आहे. मात्र यात महाराष्ट्र सरकार कमी पडते आहे. या वादात गृहमंत्री अमित शहा मध्यस्थी करण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. मात्र, बोम्मई कुणाचेही ऐकणाच्या मनस्थितीत नाही, मी कुणाचेही ऐकणार नाही अशी आडमूठी भूमिका चुकीची आहे. ते एक इंच ही देणार नाही असे म्हणतात ते कोर्ट ठरवेल असेही भुजबळ यांनी सुनावले.

भुजबळ पुढे म्हणाले, अहमदाबाद मध्ये जितके गुजराती नाही तेवढे मुंबई मध्ये आहेत. बेंगलोर मध्ये जेवढे कन्नड व पटना मध्ये जेवढे हिंदी भाषिक नाही तेवढे मुंबईत आहेत. तिकडे एवढी सुबत्ता असती तर महाराष्ट्रात हे लोक घरदार सोडून आले असते का? असा सवाल करत महाराष्ट्रात तुलनेने अधिक सुबत्ता असल्याचे भुजबळ म्हणाले.

त्या घटनेची करुन दिली आठवण …

बेळगाव कारवाचे निवेदन मोरारजी देसाई यांना द्यायचे होते. मोरारजी देसाई यांनी गाडी न थांबविता एका शिवसैनिकाला गाडीने उडविले, त्यानंतर मुंबई पेटली. त्यावेळी प्रचंड गोळीबार झाला, मोठ्याप्रमाणावर प्राणहानी झाली. त्यात बाळासाहेबांना अटक झाली. त्यावेळी बाळासाहेबांनी तुरुंगातून अपील केले व त्यानंतर मुंबई शांत झाली. शिवसैनिकांनी मुंबईची साफसफाई सुद्दा केली. अशी आठवणही भुजबळ यांनी करुन दिली.

logo
Pudhari News
pudhari.news