आ. राजन साळवींच्या कुटुंबीयांचीही चौकशी

आ. राजन साळवींच्या कुटुंबीयांचीही चौकशी

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : राजापूरचे आमदार राजन साळवी यांचे ज्येष्ठ बंधू दीपक साळवी व त्यांच्या पत्नी अनुराधा साळवी यांची गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि लांजा राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या विरोधात साडेतीन कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गुन्हा दाखल असून, या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरु आहे.

या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिवसभर आ. साळवी यांचे ज्येष्ठ बंधू दीपक साळवी तसेच त्यांच्या पत्नी अनुराधा साळवी यांची रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशी करण्यात आली. ऐन शिमगोसवात आणि निवडणुकीच्या धामधुमीत ही चौकशी सुरू असल्याने आ. राजन साळवी यांना सरकारकडून नाहक त्रास देण्याचाच प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news