India’s Anju Gets Gift : पाकिस्तानमध्ये गेलेल्या अंजूला व्यावसायिकाने दिलं हे महागडं ‘गिफ्ट’

India’s Anju Gets Gift : पाकिस्तानमध्ये गेलेल्या अंजूला व्यावसायिकाने दिलं हे महागडं ‘गिफ्ट’

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूला एका व्यावसायिकाने खास भेटवस्तू दिली आहे. भारतातून पाकिस्तानमध्ये जाऊन विविहबद्ध झालेल्या या अंजूची चर्चा सोशल मीडियावर खूपच आहे. आता तिला पाकिस्तानमध्ये मिळत असणाऱ्या भेटवस्तूंबाबत खूपच चर्चा आहेत. पण अंजूला या भेटवस्तू का मिळत आहेत याबाबत अधिक माहिती घेेऊया. (India's Anju Gets Gift)

अंजू नुसरुल्लाह भारतातून पाकिस्तानात गेली. तिथे पाकिस्तानी तरुणाशी विवाहबद्ध झाली. तसेच तिने धर्मांतरही केले. त्यानंतर आता तिला एका व्यावसायिकाने मोठं गिफ्ट दिलेलं आहे. तिला एका प्रसिद्ध व्यावसायिकाने भेट म्हणून प्लॉट दिलेला आहे. याठिकाणी ती घर देखील बांधणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. तसेच तिला पाकिस्तानचे नागरिकत्व मिळाल्यानंतर नोकरी देखील दिली जाणार आहे. (India's Anju Gets Gift)

अंजूला भेटवस्तू का दिली? Why did you give Anju a gift?

मोहसीन खान अब्बासी असे या पाकिस्तानी व्यावसायिकाचे नाव असून ते रिअल इस्टेटचा व्यवसाय करतो. त्यांच्याकडून अंजूला एक प्लॉट भेट देण्यात आला आहे. पाकिस्तानी मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की, अंजूने ख्रिश्चन धर्मातून इस्लाम स्वीकारला आहे. तिचे मनापासून स्वागत केले पाहिजे. अंजूच्या मदतीसाठी अन्य बड्या उद्योगपतींनीही पुढे यावे, असा आग्रह या व्यावसायिकाने धरला. त्यांच्याकडूनही भेटवस्तू आणि मदत मिळायला हवी. पाकिस्तानातही पैसेवाले लोक आहेत, त्यांनी मदत करावी अशी प्रतिक्रिया अब्बासी यांनी दिली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news