नगर : अखेर उत्सुकता संपली ! सरपंचपदी विराजमान होताच इंदूरीकर महाराजांच्या सासुबाईंची मोठी घोषणा

नगर : अखेर उत्सुकता संपली ! सरपंचपदी विराजमान होताच इंदूरीकर महाराजांच्या सासुबाईंची मोठी घोषणा

संगमनेर: पुढारी वृत्तसेवा  : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई काही दिवसांपूर्वीच सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. त्या संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावातून सरपंचपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या होत्या. त्यांनी या निवडणुकीत बाजी मारत निळवंडे गावाचं सरपंचपद पटकावलं. इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकला पवार या सरपंच झाल्यानंतर त्या नेमक्या कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर आज ती उत्सुकता संपली आहे.

शशिकला पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. शशिकला पवार यांनी निळवंडे गावाची ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी या निवडणुकीत सरपंचपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून आपली उमेदवारी दाखल केली. त्या या निवडणुकीत विजयी देखील झाल्या, मात्र त्या अपक्ष असल्यानं नेमका कोणाला पाठिंबा देणार याबाबत उत्सुकता होती. अखेर शशिकला पवार यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला. दरम्यान शशिकला पवार या आमच्या गटात असल्याचा दावा थोरात गटाकडून देखील करण्यात आला होता. मात्र आज शशिकला पवार यांनी हाती कमळ घेतले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news