चीनमधील ४२ मजली इमारतीला भीषण आग (Video)

चीनमधील ४२ मजली इमारतीला भीषण आग (Video)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनच्या चांगशा शहरातील एका ४२ मजली इमारतीला आज (दि.१६) भीषण आग लागली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून त्यात खालच्या मजल्यापासून वरपर्यंत आग लागल्याचे दिसत आहे. मृतांची संख्या अद्याप समजू शकलेली नाही. इमारतीतून मोठ्या प्रमाणात धूर निघत आहे. अनेक मजल्यातून आगीच्या ज्वाळा निघत आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आग लागलेल्या इमारतीमध्ये चायना टेलिकॉम कंपनीचे कार्यालय आहे.

अग्निशमन दलाच्या ३६ गाड्या घटनास्थळी दाखल

साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी ३.४८ वाजता इमारतीला आग लागली. अग्निशमन दलाच्या ३६ गाड्या आग विझवण्यात गुंतल्या आहेत. १७ अग्निशमन केंद्रांमधून २८० हून अधिक अग्निशमन दलाचे जवान मदत आणि बचाव कार्यासाठी दाखल झाले आहेत. सायंकाळी ५ वाजेपर्यंत आग धुमसत होती. आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद झालेले नाही.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news