अमेरिकन ख्रिश्चनांच्या संख्येत २६ टक्के घट

अमेरिकन ख्रिश्चनांच्या संख्येत २६ टक्के घट
Published on
Updated on

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेत ख्रिश्चन धर्मावर श्रद्धा असणार्‍यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. गेल्या 50 वर्षांतील ही घट 26 टक्क्यांपर्यंत आहे. धर्माबद्दलच्या अनास्थेने अनेकांनी चर्चमध्ये जाणेच बंद केले आहे. लाइफ वे रिसर्च या संस्थेच्या अहवालानुसार, अमेरिकेतील 4 हजार 500 चर्चना सध्या कुलूप लागलेले आहे.

आकडे बोलतात

  • 64 % अमेरिकन ख्रिश्न लोक सध्या धर्माबद्दल आस्था असलेले आहेत. 1970 मध्ये ही संख्या 90 % होती.
  • 30 आणि 39 वयाचे ख्रिश्चन कुटुंबात वाढलेले एक तृतीयांश अमेरिकन धर्माबद्दल उदासीन आहेत.
  • 20 % युवकच सध्या चर्चमध्ये जातात.
  • 10 प्रौढांपैकी (ख्रिश्चन कुटुंबांत वाढलेल्या) सध्या चारजण निरीश्वरवादी आहेत.

पुढे काय?

अमेरिकेची लोकसंख्या 33.9 कोटी आहे. ख्रिश्चन धर्म मानणार्‍यांची संख्या सध्याच्याच दराने पुढेही घटत राहिली, तर 2055 पर्यंत या देशात बिगर ख्रिश्चनांची संख्या ख्रिश्चनांपेक्षा फार वाढलेली असेल.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news