Hawaii wildfires : भारतातून अमेरिकेत आयात केलेला १५० वर्षांचा वटवृक्ष जळून खाक

Hawaii wildfires : भारतातून अमेरिकेत आयात केलेला १५० वर्षांचा वटवृक्ष जळून खाक

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातून आयात केलेला 150 वर्षांचा वटवृक्ष आणि यूएस मधील सर्वात मोठा वृक्ष आज जगण्यासाठी संघर्ष करत आहे. कारण माउईच्या हवाईयन बेटावर लागलेल्या वणव्यात तो होरपळत आहे. ऑनलाइन पोर्टल lahainatown.com च्या वृत्तानुसार 1873 मध्ये माउईच्या लाहाइना शहरात 46 खोडांचा केवळ 8 फुटांचे रोपटे लावले होते. त्याला हवाईयन भाषेत पानियाना असे म्हणतात. (Hawaii wildfires)

भारतातून आयात केलेले आणि 1873 मध्ये लाहेना कोर्टहाऊस आणि लहेना हार्बरसमोर लावलेले हे विस्तीर्ण वृक्ष युनायटेड स्टेट्समधील सर्वात मोठ्या वटवृक्षांपैकी एक आहे. (Hawaii wildfires)

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, लहैना या ऐतिहासिक शहरात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या अनेक गोष्ट पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. या आगीत मौल्यवान आणि विस्तीर्ण वटवृक्ष जळून खाक झाले आहेत.

या वटवृक्षाने यावर्षी एप्रिलमध्ये आपला 150 वा वाढदिवस साजरा केला होता. या त्याची सध्याची अवस्था अस्पष्ट आहे. जळाल्यामुळे वटवृक्ष मरणासन्न अवस्थेत आहे, हे खरोखरच वेदनादायी आहे. परंतु ते तग धरून उभे आहे. या वृक्षाची मुळे जर निरोगी असतील तर ते पुन्हा जोमाने वाढू शकेल, असा विश्वास लाहैना रिस्टोरेशन फाउंडेशनचे कार्यकारी संचालक थियो मॉरिसन यांनी बीबीसीला सांगितले.

हवाई पर्यटन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, लाहैनामधील एक प्रमुख खूण असलेल्या वटवृक्षाने स्थानिकांना आणि पाहुण्यांना पिढ्यानपिढ्या थंडगार सावली दिली आहे. इव्हेंट आणि कला प्रदर्शने अनेकदा त्याच्या सावली खाली आयोजित केले जातात. लाहैना रिस्टोरेशन फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार, वटवृक्षाला त्याच्या मूळ खोडा व्यतिरिक्त 46 प्रमुख खोड आहेत. एक एकरच्या जवळपास दोन तृतीयांश भागात त्याची मुळे पसरली आहेत.

माउई येथे लागलेल्या विनाशकारी वणव्यात आतापर्यंत किमान ६७ जणांचा बळी गेला आहे. हजारो लोक विस्थापित झाले आहेत. येथील इमारती जळून खाक झाल्या आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news