सांगवीत भरदिवसा गोळीबाराचा थरार; सराईत गुन्हेगार योगेश जगतापचा मृत्यू | पुढारी

सांगवीत भरदिवसा गोळीबाराचा थरार; सराईत गुन्हेगार योगेश जगतापचा मृत्यू

पिंपरी : दत्त जयंतीच्या कार्यक्रमात आलेल्या अज्ञात इसमांनी एका तरुणावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. हा प्रकार शनिवारी सकाळी काटेपुरम चौक, सांगवी येथे घडला. योगेश जगताप (रा. पिंपळे गुरव, सांगवी) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

‘अंडे आधी की कोंबडी?’ संशोधकांनी शोधले उत्तर

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश जगताप हा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता. दरम्यान सकाळी दहाच्या सुमारास काटे पुरम येथे दत्त जयंतीचा कार्यक्रम सुरू असताना अज्ञात इसमाने त्याच्यावर दोन राऊंड फायर केले. त्यानंतर आरोपींनी एका महिलेची बंदुकीच्या धाकाने दुचाकी घेऊन तेथून पळ काढला. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून यामध्ये आरोपी कैद झाल्याचे सांगितले जात आहे. मृत पावलेला जगताप हा देखील सराईत गुन्हेगार होता. यापूर्वी त्याच्यावर तडीपारीची कारवाईदेखील करण्यात आली होती.

Back to top button